राष्ट्रवादीचे संरक्षण भिंतीसाठी भिक मांगो आंदोलन

0

धुळे । शहरातील गजानन कॉलनी, हमाल मापाडी प्लॉट, वाखारकर नगर भागातून वाहणार्‍या नाल्यास संरक्षण भिंत बांधून मिळावी यासाठी गेल्या 2007 पासून सतत पाठपुरावा करुन देखील महापालिकेतर्फे दुर्लक्ष केले जात असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे कार्यकर्ते तथा शिवशाही हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष रजनिश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज भिक मांगो आंदोलन करीत महापालिका कारभाराविरुध्द निदर्शेने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे, मंगलदास काळे, सचिन मराठे, मोहित शेळके, कार्तिक मराठे, विशाल रनमळे, विनोद रनमळे, निलेश ठाकरे, संतोष चौरसिया, विमल अशोक निंबाळकर, ज्योती रजनीश निंबाळकर,मिना रविंद्र गवळी, संगीता मनोज दांडगे, जिजाबाई चौधरी, अनिता दुसे, सुनंदा पारखे, लताबाई अशोक पारखे, वंदना गोरे, मिनाबाई मिस्तरी, सुनंदा मोरे, अरुणा काळे, रेखा रविंद्र चौधरी, मिनाक्षी गवळी, संगिता गवळी आदी आंदोलनात सहभागी झाले.