मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेच्या छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार विद्या चव्हाण, त्यांचे पती, दोन्ही मुले, दुसरी सून यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगी झाल्याने कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप त्यांच्या सूनेकडून करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांचाही जबाब नोंदवून घेतला आहे. आमदार विद्या चव्हाण यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
आमदार विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सूनेच्या मोबाईलमधील whatsapp चॅट आणि अन्य बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची निदर्शनास आले. माझ्या मुलानं यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता,” असा गौप्यस्फोट आमदार विद्या चव्हाण यांनी केला आहे.