नवापूर । नवापुर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्या सवार्ंचा सत्कार तालुका काँग्रेस भवानात माजी जि.प अध्यक्ष तथा नवापुर तालुका अध्यत्र भरत गावीत, पं.स उपसभापती दिलीप गावीत, गटनेते गिरीष गावीत, तालुका उपाध्यक्ष आर. सी. गावीत, नगरसेवक आयुब बलेसरीया,शहर अध्यक्ष प्रा.नवल पाटील, माजी नगरसेवक विनय गावीत यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की महिलांनी मोठ्या प्रमाणात कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आमदार सुरुपसिंग नाईक व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव गावीत यांच्या खांद्याला खांद लाऊन विकास काम करायचा आहे. दिपांजली गावीत यांच्या नेतृवाने महिला संघटन वाढले आहे. ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांची निराशा होणार नसून सर्वांना पक्षामध्ये न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. दिलीप गावीत , आर. सी. गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन आर. सी. गावीत यांनी तर आभार विनय गावीत यांनी मानले. याप्रसंगी रामकु गावीत, विनायक गावीत, सिंगा मावची, धनजी गावीत आदी उपस्थित होते.
यांनी केला पक्ष प्रवेश
यावेळी रा.काँ.चे कलीम खाटीक, दिपाजली गावीत, आरीफा शेख, मुमताज मिझा, सायरा शेख, रुकसार आलवाला, नसिम शाह, शेहनाज शाह, मेहरुन शेख, सकिना खाटीक, सुरता वसावे, शिला गावीत, राजु पंचोली, कैलास गावीत, राम गौड, सुरेश गिरी, शिवा गौंड, अनिल मोहीते, ईरफान शाह, ईल्यास शेख, तौसीफ सय्यद, लतीफ खाटीक, अजहर बेलदार, मेहमुद बेलदार, मंहमद भुला, ललीत अग्रवाल, जब्बार शाह, फिलीप गावीत, सुनिल गावीत, धुलजी गावीत यांनी प्रवेश केला.