मुंबई-छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्सव साजरा करत आहे. परंतु मी त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की, हे फक्त जामीन मिळाले आहे. त्यांना अजून निर्दोष मुक्तता मिळालेली नाही. त्याच्या विरोधात केलेले सर्व आरोपात तथ्य आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जास्त हरकून जाऊ नये असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला आहे. ट्वीटरवर त्यांनी ही टीका केली आहे.
Shri Chhagan Bhujbal granted bail by Mumbai High Court. NCP seems to be celebrating. But I would like to remind them that this is only a BAIL. He has NOT been acquitted. All charges against him have been established and it is a matter of time before he goes back to prison.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 4, 2018