राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या घरासमोर सोडले खेकडे !

0

पुणे: रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून २३ जण बेपत्ता झाले होते. त्यातील १९ जणांचे मृतदेह हाती लागले. याप्रकरणी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी धरण खेकड्यांनी पोखरल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून बरीच टीका झाली. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री ताजनी सावंत यांच्या पुणे येथील निवासस्थानासमोर खेकडे सोडत निषेध व्यक्त केला.

तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यंगात्मक टिप्पणी देखील करण्यात आली.