राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यात भर

0

विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वात सेनेच्या युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी-चिंचवड : शहरात सध्या राष्ट्रवादीच्या युवक फळीकडून आंदोलनाची धार तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये सरकारच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका करण्या बरोबरच आंदोलनाव्दारे देखील हल्लाबोल करण्यात सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा राष्ट्रवादीचा गजर सुरु झाला असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांकडुन बोलले जात आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी नुकताच शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करुन घेतला आहे. तर भाजपा पक्षाचे देखील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते टप्प्या टप्प्याने राष्ट्रवादीत प्रेवश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हल्लाबोल आंदोलनात आणखी प्रवेश
वाकडकर यांच्या अभिष्टचिंतन मेळाव्यात वाकड येथे झालेल्या कार्यक्रमात युवा सैनिकांनी प्रवेश केला. यावेळी वाकडकर म्हणाले, पुढील आठवड्यात भोसरी आणि चिंचवड येथे होणार्‍या हल्लाबोल आंदोलनात भाजपा, सेना, मनसे आणि आरपीआय मधील हजारों कार्यकर्ते, महिला व पदाधिकारी लोकनेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आगामी काळात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने राज्यात राबविलेली चुकीच्या धोरणांना तीव्र विरोध करु. तसेच पिंपरी चिंचवड मधील अन्यायकारक शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, चोवीस तास पाणीपुरवठा, कचरा डेपो समस्या, शहरात घटणारे रोजगारांचे प्रमाण आदी प्रश्‍नांवर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु.

यांनी केला प्रवेश
युवा सेना पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस पंकज चोपदार, उपाध्यक्ष शुभम काळे, उपाध्यक्ष कुणाल रावडे, सरचिटणीस सुरज उंबरकर, सांगवी प्रभागमधील विरेंद्र हेगडे, कुणाल वाघमारे, हर्षद म्हेत्रे, शेखर स्वामी, ऐश्‍वर्या देशपांडे तसेच डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयातील युवा सेनेच्या पदाधिका-यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप लाला चिंचवडे, उपाध्यक्ष विशाल पवार, मयूर जाधव, सरचिटणीस चैतन्य चोरडीया, सतीश कोकाटे, योगेश मोरे, अमेय नेरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.