राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा आणि त्यांच्या गुंडाचा प्रताप

0

ठाणे : पालिकेच्या सत्तेत विरोधकांची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद आता रस्त्यावर आला आहे. कळव्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गुंडांची टोळी सोबत घेऊन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन कापण्याचा प्रयत्न केला असता त्याला विरोध करणाऱ्या सेनेच्या माजी नगरसेवकाला राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी आणि त्याच्या गुंडानी बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणावरून कळवा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांच्यासह सहा लोकांवर मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मंगळवारी संध्याकाळी ४-३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी आणि त्यांचे दबंग पंकज पांडे,दाढी मिस्त्री,रवींद्र मोर्या, पिंटो आणि गौडकर यांच्यासह गेसकटर घेऊन महादेव चाळ, पौंडपाडा, कळवा पूर्व येथील पाण्याची पाईप लाईन कापण्यासाठी पोहचले असता शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रकांत सखाराम कळंबे(५२) यांनी महेश साळवी याना विरोध केला. विरोध करताच राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनी सोबत आणलेल्या गुंडानी कळंबे याना बेदम मारहाण केली. सोबतच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चंद्रकांत कळंबे यांनी कळवा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांच्यासह सहा जणांवर जबर मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपस कळवा पोलीस करीत आहेत.