पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने काळे फासल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यानी आज (शुक्रवारी) पालिका मुख्यलयासमोर निदर्शने केली.
गेल्या वर्षभरापासून काळभोरनगर, चिंचवडस्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी गावठाण या परिसरामधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता सुशीलकुमार लवटे यांना गुरुवारी काळे फासले होते.