राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून आयुक्तांचा ‘सत्कार’

0

पिंपरी : शहरातून वाहत असलेल्या पवना नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. यातूनच वाढलेल्या डासांमुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासन जलपर्णी काढण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जलपर्णीचा गुच्छ देऊन असा सत्कार केला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका सुलक्षणा धर, माई काटे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, श्याम लांडे आदी उपस्थित होते