शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
पिंपरी । प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कामगार सेलच्या अध्यक्षपदी किरण चंद्रकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाचे पिपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस संघटक व कामगार नेते अरुण बो-हाडे, महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे इतर सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत किरण चंद्रकांत देशमुख यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पक्षाचे प्रवक्ते फाजल शेख , ज्येष्ठ नेते महमद पानसरे, शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष विजय लोखंडे, लिगल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, दत्तात्रय जगताप, महिला पदाधीकारी कविता खराडे, निर्मला माने, मनिषा घटकळ, शिल्पा बिडकर आदी उपस्थित होते.