म्हसळा । तालुक्यात पदनियुक्तीचे वारे वाह आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्यावतीने म्हसळा तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी रेश्मा रमेश कानसे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून ग्रामपंचायत घोणसे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे.
तालुक्यात राजकीय पक्षांनी तालुका पदाधिकारी व पक्ष कार्यकारिणी फेरबदलाची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यात अगोदर कार्यरत असणार्या पदाधिकार्यांना जिल्हा कमिटीवर घेऊन त्यांना वरचे स्थान दिले आहे. तर ज्यांचे काम समाधानकारक नाही अशांना पदावरून डच्चू देण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या तथा पक्ष प्रतोद वैशाली सावंत यांची जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर पक्षाचे जेष्ठ नेते व्यंकटेश सावंत यांची श्रीवर्धन मतदार संघ सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. तसेच म्हसळा शहर युवक अध्यक्ष पदी नईम दळवी यांची निवड करण्यात आली आहे.