राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा खून

0

दिघी : माजी नगरसेवक घनश्याम खेडकर यांच्या पुतण्याचा खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. राजेंद्र दिगंबर खेडकर (वय 30, रा. च-होली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे सकाळी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या शरीरावर जखमांचे वण आढळले असल्याने अज्ञात इसमांनी खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.