राष्ट्रवादीच्या मालकीच्या जागेचे केले मोजमाप

0

जळगाव। अजिंठा चौफुलीवर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यालयासाठी 14 हजार स्केअरफूट जागा घेण्यात आली आहे. या जागेवर दोन दुकाने असून भाडे पक्षातीलच एक नेता घेत आहे. हा प्रकार योग्य नाही.

या दुकानदारांना समज देण्यात आली असून भाडे कार्यालयाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या जागेचे मोजमाप शनिवारी करण्यात आली. जागेची सीमा रेषा निश्‍चित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, विकास पवार, अ‍ॅड.सचिन पाटील, निलेश पाटील आदी उपस्थित होते.