शिंदखेडा। नगरपंचायत निवडणूकीत प्रचार शिगेला पोहचला असून प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सोनाली सुयोग भदाणे यांनी आघाडी घेवून भाजपाच्या उमेदवारासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. सोनाली भदाणे ह्या उच्च शिक्षित उमेदवार आहेत. इंग्रजी विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सोबतच त्यांनी डि.एड, बी.एड ची पदविका घेतली आहे. त्यांचे माहेर जळगाव जिल्ह्याील विखरण (एरंडोल) येथील तर सासर शिंदखेडा येथील आहे. माहेर व सासरच्या मंडळींची राजकिय पार्श्वभूमी असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची तालूका सचिव पदाची जबाबदारी समर्थपणे पेलत पक्ष संघटनात महत्वाची भूमिका बजावली आहे. पक्षाचे पद असो किंवा नसो सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर ते असतात. पक्षाने केलेल्या कामाची दखल घेत सुयोग भदाणे यांच्या पत्नी सौ.भदाणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांची प्रमुख लढत भाजपाच्या उमेदवाराशी आहे. प्रचारात सौ.भदाणे यांनी आघाडी घेतली असून कडवे आव्हान विरोधकांसमोर उभे केले आहे. सौ.भदाणे यांनी महिलांच्या विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवून जनसंर्पक वाढविला आहे. त्यांनी होम-टू-होम प्रचार करण्यात पुढाकार घेतला आहे. मतदारांकडूनही त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
माझी उमेदवारी का?
अनेक वर्ष पाणी प्रश्ना भोवतीच शहराचे राजकारण फिरत राहिले आहे. पाणी प्रश्न, रस्ते, गटारी, पथदिवे, सिमेंट ब्लॉक, नियमीत घंटागाडी, आवश्यक तेथे हायमास्ट, चौक सुशोभिकरण मोफत शौचालय, आदी कामे पूर्णत्वास नेण्यासाठी गटनेते प्रा.सुरेश देसले यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले. कायम स्वरूपी पाणी पूरवठा योजना, नियोजित भाजी मंडई ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. भविष्यात कॉलनी परीसरात वरील सर्व सूविधा सातत्याने पूरविण्यासाठीच प्रयत्न राहणार आहे. कॉलनी परीसरात असलेल्या महिलांसाठी नगरपंचायती मार्फत विवीध शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच माझी उमेदवारी आहे. कॉलनी परीसरातील नागरीकांना आपल्या समस्या कोणाकडे घेवून जाव्यात असा प्रश्न भेडसावत होता. पती सुयोग भदाणे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय सूरू केल्याने नागरिक समस्या घेऊन येतात व त्या सोडविण्याची संधी मिळते.