सर्व पक्षातील बडे नेते स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु, राष्ट्रवादीच्या स्टारप्रचारकांच्या यादीतून शरद पवाराचे नाव वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगला दिलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शरद पवारांचे नाव गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता यावी यासाठी शरद पवार निवडणूकीच्या रिंगणात सभा गाजवत आहेत. परंतु, राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत शरद पवारांचे नाव गायब झाले आहे. शिवसेनेने राज्यातील सर्वच बड्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपनेही राज्यातील नेत्यांबरोबर केंद्रतून नेते आयात केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणूकीत चांगलीच रंगत पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वेगवेगळ्या ठिकाणी सभा गाजवत आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शरद पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.