राष्ट्रवादीतर्फे नोटबंदी धोरणाच्या निषेधार्थ वर्षश्राद्ध

0
जळगाव । केद्र शासनाच्या नोटबंदी धोरणाच्या निषेधार्थ निदर्शने तसेच महाराष्ट्र सरकारच्या 3 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा निषेध व जनतेच्या शेतकर्‍यांच्या मागण्यासोडविण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदी वर्षपुर्ती निमित्त वर्षश्राद्घाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतिश पाटील यांच्या उपस्थित कार्यक्रम करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रसतर्फे या मागण्या करण्यात आल्या
छ.शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेची मोठी जाहिरात करून मोठा गाजावाजाद्वारे सुरू करण्यात आली. दिलेल्या जाहिरात सर्व शेतकरी सरसकट कर्जमुक्ती देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मात्र योत सरकारने जाहिर केलेली कर्जमुक्ती फसवी असल्याने जाहिरातीप्रमाणे सरसकट 100 टक्के अंमलबजावणी करावी. धान्य, भात, सोयाबिन, तुर व इतर कृषी मालाची खरेदी सरकारने किमान आधार भूत किंमत देवून करावी. कापूस व सोयाबिनला हमीभाव मिळाला नसल्याने शासनाने तातडीन ओला दुष्काळ जाहिर करावा. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे विजेच्या प्रश्‍नही राज्यात अतिशय गंभर झालेला असून अपुर्‍या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, उद्योज आणि विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून विजपुरवठा नियमित करावा. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाबाबत चर्चा होवून 3 वर्षे पुर्ण झालेली नाही त्यामुळे दोन्हा स्मारकाबाबत त्वरीत चर्चा करण्यात येवून अंमलबजावणी करावी. देशात व महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षामध्ये महिला व बालविकास व अल्पसंख्याक मागासवर्गीय यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात यावे. शिवसेन व भाजपा सरकारतर्फे तरूणांना नविन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबाबत जी स्वप्ने दाखविली होती ती पुर्ण करण्यात यावी.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतिश पाटील, विकास पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मंगला पाटील, कल्पीता पाटील, लिना चौधरी, नगरसेविका श्रीमती मोरे, सविता बोसरे, विलास पाटील, राष्ट्रवादी युवकाध्यक्ष ललीता बागूल, योगेश देसले, वाल्मिक पाटील, पराग पाटील, सचिन पाटील, प्रा. जयप्रकाश माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.