राष्ट्रवादीतर्फे मीनल लोहार यांचा अर्ज दाखल

0

नवापूर । नगर पालिकेचा निवडणुक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदनारांनी वेग घेतला असून आज तीसर्‍या दिवसी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे वार्ड क्र.3 (अ) मधुन मीनल अमृत लोहार यांनी मागास वर्ग स्त्री यावर्गातुन नामनिर्देशन फार्म भरला तसेच वार्ड क्र 7 (अ) मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गतर्फे अपक्ष उमेदवार म्हणुन सुनिल धाकु भोई यांनी उमेदवारी फार्म उपजिल्हाधिकारी डॉ अर्चना पठारे यांच्याकडे दाखल केला. यावेळी,मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे नायबतहसिलदार राजेंद्र नजन उपस्थित होते. आज नामनिर्देश फार्म भरण्याचा 3 रा दिवस होता. मात्र आज तीनच नामनिर्देशन पत्र भरण्यात आले आहे.

काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवाराचे नाव गुलदस्त्यांत
सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत तहसिल कार्यालयाचा आवारात शुकशुकाट होता. या सर्व प्रक्रीया न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे,अनंत पाटील,रविंद्र बागले,प्रशांत भट,उमेश वळवी,आर.बी.वळवी,प्रेमानंद गावीत,वामन अहिरे,मिलिंद निकम,सतीष बागुल यांनी पार पाडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यावेळी कमालीची ढिल प्रक्रिया उमेदवारांकडुन दिसून आली. काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदासाठीची उत्सुकता व सस्पेन्स आज ही कायम होता. रोज नवीन नवीन नावाची चर्चा रंगत आहे. काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल आज पर्दा खुल जायेंगा. यंदा नावाबाबत शेवटपयर्ंत युवा नेत्यांनी कमालीचा संयम व परपक्व राजकारणाचा झलक दाखवुन दिली आहे.