राष्ट्रवादीतील वादाची ‘कात्री’ !

0

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षातले अंतर्गत वाद जगासमोर आले होते. या पार्श्‍वभूमिवर बुधवारी अजिंठा विश्रामगृहाच्या परिसरात दुपारून लावलेला एक फलक चर्चेचा विषय बनला.

यात त्या बैठकीतले छायाचित्र लाऊन शरद पवार यांनी यात दिसणार्‍या नेत्यांना कात्री लावण्याचे आवाहन करण्यात आले असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.