राष्ट्रवादीत असताना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही: उदयनराजे

0

सातारा: साताऱ्यात यंदा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रच होत आहे. लोकसभेसाठी उदयराजे भोसले तर विधानसभेसाठी शिवेंद्रराजे भोसले भाजपचे उमेदवार आहे. दोघांनीही नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान आज दोघांची प्रचारफेरी निघाली होती. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीत मला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही असा टोला राष्ट्रवादीला लगावला. तसेच देशात भाजपची सत्ता असल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात अनेक कामांसाठी मदत केल्याने भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रथमच शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र प्रचारफेरीत दिसले. यावरून शिवेंद्रराजे यांनी आम्ही दोन्ही भाऊ कायमसाठी एकत्र आलो आहोत असेही सांगितले.