ठाणे: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत बरोरा शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी नेते म्हणून पाहिले जात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा होत असलेला पराभव पाहता त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे.