सोलापूर: राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाला लागलेली गळती अद्याप थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येते. खास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे राष्ट्रवादी-कॉंग्रेसला जबर धक्के बसत आहेत. दरम्यान आता बार्शीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल हे देखील लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. खुद्द सोपल यांनी याबाबत घोषणा आज सोमवारी केली आहे.
२८ रोजी ते शिवबंधानात अडकणार आहे. मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.