राष्ट्रवादीला हादरा बसण्याची शक्यता; मुंबईतील ५२ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत !

0

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील नेत्यांची गळती सुरूच आहे. काही आमदार, माजीमंत्री यांनी पक्ष सोडत भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीसाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व ५२ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे, असे झाल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादीकडे एकही नगरसेवक उरणार नाही. तसेच भाजप-सेनेची सत्ता महापालिकेत येईल.

आज रविवारी 28 रोजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यात गणेश नाईक यांच्याकडे भाजप प्रवेशाची मागणी करण्यात आली आहे.