राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रयत्न – अशोक चव्हाण

0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव । आगामी निवडणुकांमध्ये सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे आमचे प्रयत्न राहतील, जळगावात काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, काँग्रेसच्या संघटनांची रिक्त पदे भरली जातील, जिल्ह्यात काँग्रेस सक्षम केली जाईल, अशी माहिती कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. रामदेव बाबा हे भाजपचे खरे लाभार्थी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दावोसला पंतप्रधानांसोबत 32 आचारी, 6 केंद्रीय मंत्री, 100 सिईओ असे सर्व गेले असून यावर मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. संघटना बांधणीसाठी, देशातील परिस्थितीवर चचा करण्यासाठी व आमच्यातील उणिवा दूर करण्यासाठी, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आदी उपस्थित होते.