भुसावळ : माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुुनील तटकरे, विधी मंडळ गटनेते अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रसंगी विधान परीरषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रमोद हिंद राव आदी उपस्थित होते. नेमाडे यांच्या निवडीनंतर शहरातील विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.