राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धरणे

0

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत नागपूर येथून सुरू झालेल्या 20 डिसेंबर 2017 ला रथयात्रेला सुरूवात झाला असून 7 डिसेंबर रोजी पारोळा येथे दाखल करण्यात आली. तर सोमवारी 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मागण्यांसह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व विद्यार्थ्यांतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दीक्षाभूमी नागपूर मार्गे कोल्हापूर पुणे ते बारामती दरम्यान आयोजित केलेल्या 19 डिसेंबर ते 14 एप्रिल अविरत असे रथयात्रा दौरा 7 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल करण्यात आली.

हॉकर्स धारकांची घेतली भेट
जळगाव शहरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जनजागृती रथयात्रा समितीतर्फे सायंकाळी इदगाव ममुराबाद मार्गे, टॉवर चौकातील फुले मार्केटमध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी ओबीसी बांधव, फुले मार्केट मधील हॉकर्स बांधव यांना मार्गदर्शन करून हॉकर्स संदर्भात अडचणी जाणून घेतल्या.

या आहेत विविध मागण्या
मागासवर्गीय आयोगावार ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह करावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहिर करून त्यांना नितीआयोगाकडून निधी वेगळी तरतूद करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 5 हजार कोटी भांडवल द्यावे, उद्योग व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्जमर्यादा वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामीनाथ समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, मंडल कमीशनची 100 टक्के अंमलबजावणी करा, शेतकर्‍यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य, शेतकर्‍यांच्या तरूण मुलांना उद्योगासाठी शुन्य व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून द्या, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे. पण पुढे विधानसभा लोकसभेत ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रिशिप ताबडतोब अदा करावी, स्पर्धा परिक्षेत महिलांना नॉनक्रीमिलेअरची जाचक अटी रद्द करण्यात यावी.

राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रम
रात्री मुक्कामाला राहिलेल्या जनजागृती रथयात्रा अजिंठा विश्रामगृहात मुक्कामाला होती. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पक्षाची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा व नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हाजी गफार मलिक, ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष नंदू पाटील, ओबीसी सेल ग्रामीण अध्यक्ष उमेश नेमाडे, महानगराध्यक्ष निलेश पाटील, सविता बोरसे, रविंद्र भैय्या पाटील, जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.