राष्ट्रवादी काँगेसच्या जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्षांची निवड

0

जळगाव । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवार, 29 रोजी प्रदेश सरचिटणीस रंगनाथ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि शहराध्यक्ष जाहिर करण्यात येवून नवनियुक्त पदाधिकार्‍यांना निरीक्षक रंगनाथ काळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अ‍ॅड. रविंद्र पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे हाजी गफ्फार मलिक, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डि.के. पाटील, विकास पवार, उमेश नेमाडे, आदी
उपस्थित होते.

तालुकानिहाय नवनियुक्त पदाधिकारी
चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी दिनेश पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी ईश्‍वरसिंग ठाकूर, पाचोरा तालुकाध्यक्षपदी विजय पाटील, शहराध्यक्षपदी सतीष चौधरी, विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नितीन तावडे, भडगाव तालुकाध्यक्षपदी संतोष जाधव, शहराध्यक्षपदी शामकांत भोसले, पारोळा तालुकाध्यक्षपदी यशवंत पाटील, एरंडोल तालुकाध्यक्षपदी मनोज पाटील, शहराध्यक्षपदी नितीन चौधरी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पराग पवार, अमळनेर तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी सुरेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्षपदी धनराज माळी, जळगाव तालुकाध्यक्षपदी शंकरसिंग परदेशी, जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी रमेश पाटील, बोदवड तालुकाध्यक्षपदी डॉ. उध्दव पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी उत्तम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी विजय सोनार, भुसावळ तालुकाध्यक्षपदी रविंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नाना पाटील, रावेर शहराध्यक्षपदी शेख मेहमुद शेख हसन मन्यार, फैजपूर शहराध्यक्षपदी अन्वर खाटीक, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी अनिल साठे, जामनेर विधानसभा समिती अध्यक्षपदी किशोर पाटील, शहराध्यक्षपदी नितेश पाटील आदींची नियुक्ती करण्यात आली.

जोमाने कामाला लागा
बैठकीत बोलतांना निरीक्षक रंगनाथ काळे यांनी, नवनियुक्त पदाधिकार्‍यांना जोमाने कामाला लागून पुढील दोन महिन्यात गाव कमिटी व बुथ कमिटीचे गठण करुन बुथ पातळीवर संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा व तालुका कार्यकारिणी 7 जूनपर्यंत गठीत करण्याचे आदेश दिले असून यात महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय, दुर्बल घटकांना समाविष्ट करावयाचे आहे. तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी निवडीनंतर 2 महिन्यात गाव कमिटी व बुथ कमिटी गठीत करायची आहे. यात किमान 10 सदस्य असणे आवश्यक असल्याचेही श्री. काळे यांनी सांगितले.