जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी केली निवड
अमळनेर – येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी – आशिष पाटील, ग्रंथालय विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निंबाजी पाटील, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील, शहराध्यक्षपदी नरेंद्र महाजन, तालुकाउपाध्यक्षपदी- वैभव शिसोदे, श्रीकांत पाटील, दत्तप्रकाश देशमुख, वाल्मिक पाटील, अनिल पाटील, सरचिटणीसपदी प्रकाश पाटील, योगेश पाटील, भैय्यासाहेब पाटील, चिटणीसपदी बन्सीलाल पाटील, जिल्हापरिषद गट प्रमुखपदी संदीप पाटील यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यांनी केले अभिनंदन
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेश समन्वक उमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रिताताई बाविस्कर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, ग्रंथालय विभागाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर देसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, युवक तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, रा.यु.शहराध्यक्ष बाळू पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शिंपी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योजनाताई पाटील, शहराध्यक्ष आशाताई चावरीया आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांनाचे अभिनंदन केले.