पुणे । केंद्र व राज्य सरकारच्या जीवनावश्यक वस्तूच्या किमतीच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात सोमवारी वडगावशेरी विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले.
आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजप सरकारच्या दरवाढी वर अतिशय प्रखर टीका केली. नोटबंदी पेट्रोलचे वाढीव दर व त्यामुळे होणारी सामान्य जनतेची पिळवणूक याबद्दल उपस्थित नगरसेवक महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये भाजप सरकारवर टीका केली.
यावेळी बाबासाहेब गलांडे, नारायण गलांडे, बाळासाहेब पठारे, संजीलाताई पठारे, सुमनताई पठारे, नानासाहेब नलावडे, मनोज पाचपुते, सोमनाथ साबळे, अभिजित शहा, आशिष माने, विजय साबळे, सदाशिव गायकवाड़, विशाल गोरे, राहुल पठारे, मनोज पठारे, गणेश कांबळे, प्रयाग पठारे, रवींद्र पठारे, सागर पठारे, कैलास पठारे, राजू चव्हाण, महेश पुलवळे, शंकर पठारे, रवींद्र गायकवाड, प्रकाश पठारे, कृष्णा नायर, नितीन राठोड, मोरेश्वर चांधारे, संतोष दरेकर, अभिजित पठारे, दादा थिटे, वैभव जाधव आदी उपस्थित होते.