भुसावळ । राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे विविध मागण्यांसदर्भात मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, बुटासिंग चितोडीया, जिल्हाध्यक्ष विनोद निकम, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, महिलाध्यक्षा कल्पना अहिरे, विजय पवार, निला तल्लारे, शेख कासीम, किशोर अडकमोल, मनोज भालेराव, किरण राजपूत, सुरेश पोतदार, शेख सलीम शेख अहमद, गिरीष भारंबे उपस्थित होते.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह विविध विषयांचा अंतर्भाव
शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात येऊन त्यांना दरमहा 5 हजार रुपये अनुदान मिळावे, म्हाडा व नगरपालिका अंतर्गत घरकुल योजनेचे घरे गरजू वडार व गरीब जनेला देण्यात यावे, पंचशील नगर येथील गोरगरीब जनतेची घरपट्टी कमी दरात करावी. संजय गांधी, इंदीरा गांधी, श्रावण बाळ योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एक हजार रुपये महिना पेंशन वाढवून मिळावी. रेशन दुकानदारातर्फे रेशनकार्ड धारकांना पूर्णपणे धान्य वेळेवर मिळाले पाहिजे तसेच केशरी रेशनकार्ड धारकांना विनाअट 2 रुपये किलो दराने गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य मिळाले पाहिजे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळावी आदी मागण्यांचा अंतर्भाव होता.