राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी अॅड.भूषण राऊत यांची निवड

0

पुणे :विविध सामाजिक कामातून आपली राजकीय चुणूक दाखवत भूषण राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे . भूषण राऊत  यांनी २०१३साली पॅरिस येथे भरलेल्या जागतिक युवा परिषद प्रतिनिधित्व केले आहे.कॉलेज जीवनापासून वादविवाद स्पर्धा तसेच पुण्यामध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय युवकांसाठी कार्यक्रम आयोजन देखील केले होते .अश्या विविध सामाजिक उपक्रमात विशेष सहभाग घेऊन भविष्यातील राजकीय वाटचाल दाखवत तसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वात तरुण प्रवक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक वअभिनंदन होत आहे .