जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या खंद्या समर्थक मंगला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते मंगला पाटील यांना शहराध्यक्षपदाचे नियुक्त पत्र मुंबई येथे एका कार्यक्रमात देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रवक्ता योगेश देसले आदी उपस्थित होते.