रावेर। महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरु असतांना या आंदोलनाला पाठींबा देत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने देखील येत्या 16 जुन रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
या आहेत मागण्या
सातबारा उतारा कोरा करुन भाजपा सरकारने वचनपुर्ती करण्याची मागणी, शेतकर्यांना सरसकट विज बील माफी, मीटरप्रमाणे विज बील आकारणी न करता हॉर्सपॉवर पद्धतीने आकारणी करावी, शेतकर्यांना बि-बियाणे व रासायनिक खते मोफत देण्यात यावी, शेतमालाला उत्पादनावर आधारित हमी भाव मिळावा, केळी पीक विमा योजनेत सुधारणा करावी, तालुक्यात मक्यावर प्रक्रिया उदयोगांची उभारणी करावी, जलयुक्तची कामे डोंगराळ भागात न करता सपाट भुपृष्ठावर सुकी. भोकर, नागोरी व कर्जोद नदी व लहान मोठ्या नाल्यावर करण्यात यावी, एपीएल कार्ड धारकाना रेशन मिळावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 16 जुन रोजी रावेरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी 2 वाजता रस्ता रोको करुन शासनाचा निषेध करणार आहे. याबाबत शनिवारी तहसिल, कृषी व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, यावेळी माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, बाजार समिती संचालक निळकंठ चौधरी, कृष्णराज पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, पिंटू महाजन, महेश लोखंडे भागवत चौधरी, सलीम शेख, डॉ. सत्तार, महमूद हाजी, सुनिल देसले, योगेश कोळी व पदाधिकारी उपस्थित होते.