राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचा ठिय्या आंदोलन

0

जळगाव। राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मार्चातील पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वतः खाली येऊन निवेदन स्विकारावा अशी मागणी केली.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग
हे आंदोलन शासनाविरोधात नसून प्राशसनाविरोधी असल्याचे चित्र दिसून आले. शेतकर्‍यांना कजर्माफी मिळावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी पक्षाने मंगळवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातीत राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयापासून रास्तारोको केला, त्यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळी 7.30 वाजेर्पयत ठिय्या आंदोलन सुरु होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह महिला पदाधिकार्‍यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचा ठिय्या आंदोलन
मात्र जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय नियम दाखवत खाली येऊन निवेदन घेण्यास मनाई केली. त्यामुळे जिल्हाधिकारी खाली येईना आणि आंदोलन मिटेना अशी परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आली. जिल्हाधिकारी खाली येऊन निवेदन घेत नसल्याने आंदोलनकर्ते अडून बसले होते. त्यामुळे सायंकाळ पर्यत आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. पोलीस प्रशासनाचा धिक्कार- 4.00 वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पोलीस आत जाऊ देश नसल्याने आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासनात बाचाबाची झाली. आमदार सतिष पाटील व पोलीस अधिक्षक यांच्यात वैयक्तिक बाचाबाची झाली. सांगळे हे आमदार पाटील यांना आपण शिष्ट मंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्याचे सांगत होते. पाटील यांनी विरोध केल्याने त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. माजी पालकमंत्र्याशी वाद घातल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी वैयक्तिक सचिन सांगळे यांचा धिक्कार करत निषेध नोंदविला. दरम्यान आज होणार्‍या आंदोलनात डॉ. निलिमा पाटील ह्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना तातडीने दावाखान्यात दाखल करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांचा हट्ट- जल्हाधिकारी यांनी कार्यालयातुन खाली येऊन स्वतःनिवेदन घ्यावा असा हट्ट आंदोलनकर्त्यांचा होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय कारण देत आंदोलन करणार्‍या शिष्टमंडळानी वर येऊन निवेदन द्यावे असे आदेश दिले होते.