जळगाव । राष्ट्रवादी कॉग्रेसच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला पक्ष कार्यालयात गफ्फार मलिक, विकास पवार, राजेश पाटील, विलास पाटील, योगेश देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी पालकमंत्री व माजी आमदार गुलाबराव देवकर यांच्याहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. प्रसंगी माजी मंत्री श्री. देवकर यांनी कार्यकर्त्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात.
विविध मागणीचे निवेदन
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन यांनी केले. वरील कार्यक्रमानंतर ‘बळीराजाची सनद’ यातील शेतकर्यांच्या विविध मागणीचे निवेदन ईश्वर जैन, देवकर आप्पा, गफ्फार मलिक, विलास भाऊसाहेब, विकास पवार, अयाजअली, राजेश पाटील, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, योगेश देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
काय आहे बळीराजाची सनद?’
शेतकर्यांना संपुर्णपणे कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे, स्वामीनाथन आयोगा लागू करणे, शेतकर्यांकरीता वीजपूरवठा दिवसा सुरू करून स्वस्त दरात वीज देणे, बी-बियाणे, खते व औषधी यांचा पुरवठा शासनामार्फत शेतकर्यांना त्यांच्या बांधावर उपलब्ध करून देणे, अल्पभूधारकांना तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकर्यांच्या पाल्यांसाठी उच्चशिक्षणाची व शिक्षणासाठीची सुविधा उपलब्ध करणे, शेतीबरोबर जोडधंदे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदीसाठी विशेष हातभार लावणे, आत्महत्याग्रस्त कुटूंबाला उभारी देण्यासाठी विशेष योजना तयार करून अशा कुटूंबाची सर्व जबाबदारी शासनाने घेणे, ठिबक व तुषार सिंचनाचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकर्यांना देवून प्रलंबित अनुदान त्वरीत उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या आहेत.
यांची होती उपस्थिती
सदर कार्यक्रम प्रसंगी सलीम ईनामदार, शालिग्राम मालकर, बापू परदेशी, नामदेव चौधरी, निलेश पाटील, संदीप पवार, अॅड. सचिन पवार, अॅड. सचिन पाटील, रोहन सोनवणे, लताताई मोरे, सविता बोरसे, मनिषा देशमुख, ममता तडवी, किशोर पाटील, महाडीक मामा, संजय चव्हाण, एन. डी. पाटील, आशा येवले, शोभा भोईटे, चंद्रकांत चौधरी, गणेश निंबाळकर, निला चौधरी, दिलीप पवार, ललित बागुल, राजु बाविस्कर, राजेश गोयल, रमेश पाटील, पंकज आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.