रा.काँ.च्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची फेरनिवड

0

भुसावळ- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा बैठकीत जिल्ह्याचे निरीक्षक रंगनाथजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे नेते अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, तालुका निरीक्षक माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब पाटील, यावलचे उपनगराध्यक्ष मुकेश येवले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, महानगर विधानसभा क्षेत्रप्रमुख राजेश पाटील.पारोळा तालुकाध्यक्ष बाळु पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.