धुळे। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सुराय (ता. शिंदखेडा) येथील अमृत भिलाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रवक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप सोळुंके, मा. आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष प्रा. संदिप बेडसे यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली. मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमृत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजवर्धन कदमबांडे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, यशवर्धन कदमबांडे, स्मिता पाटील, सत्यजित सिसोदे, महापौर कल्पना महाले, ज्योती पावरा, मनोज मोरे आदी उपस्थित होते. अमृत पाटील हे शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य भिला पाटील, सुरायच्या माजी सरपंच कोकीळा पाटील यांचे चिरंजीव आहेत.