वरणगाव । गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष माळी यांची राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वरणगाव शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रविवार 16 रोजी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार राजीव देशमुख, माजी खासदार वसंत मोरे, माजी आमदार अरुण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्याहस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यांची होती उपस्थिती यावेळी वरणगाव नगरपरिषदेचेे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक रवींद्र सोनवणे, मराठा समाजअध्यक्ष दीपक मराठे, सामाजिक कार्यकर्ते समाधान चौधरी उपस्थित होते.