माजी आमदार मोहिते यांनी दिली माहिती
आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेस आळंदी शहर अध्यक्ष पदी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन रामकृष्ण घुंडरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. या निवडीचे पत्र मोहिते यांच्या उपस्थितीत तर पुणे जिल्हा परिषद माजी सदस्यां सुरेख मोहिते यांचे हस्ते देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पानसरे, धनंजय घुंडरे आदी उपस्थित होते.
निवडीबद्दल शहरातून स्वागत
आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करून पक्ष संघटना वाढीसाठी घुंडरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घुंडरे पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याची दखल घेण्यात आली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांचे शिफारशीने नियुक्ती झाली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खेड आळंदी विधान सभेची तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. निवडीचे आळंदी शहरातून स्वागत झाले. शहराध्यक्ष सचिन घुंडरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ला अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाईल. पक्ष संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन विकास साधणार आहे.