चाळीसगाव-महाराष्ट्र बार कॉन्सील असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड.आशिष पंजाबराव देशमुख यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या लिगल सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशान्वये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आशिष देशमुख हे माजी आमदार पंजाबराव देशमुख यांचे चिरंजीव असून चाळीसगाव शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल देशमुख यांचे भाचे आहेत. माजी आमदार राजीव देशमुख, जि.प.सदस्य अतुल देशमुख यांचे आतेभाऊ आहेत. त्यांच्या निवडीने आज त्यांच्या मुळ गावी पुसद येथे जल्लोष साजरा करण्यात आला तर चाळीसगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व चाळीसगाव बार कॉन्सीलच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.