राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे रीना मोकल हॉस्पिटलमध्ये मोफत मॅमोग्राफी कॅम्प

0

दहिसर (गणेश वड्डे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर मुंबई जिल्हा डॉक्टर सेलच्या वतीने शनिवारी डॉ. रीना मोकल हॉस्पिटल येथे मोफत मॅमोग्राफी, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. उत्तर मुंबई जिल्हा डॉक्टर सेलची बैठकही यावेळी पार पडली. या बैठकीत डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष व जिल्हा कमिटीच्या नेमणुका करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष साई महाडिक, प्रदेश सरचिटणीस सोनल पेडणेकर, मनीषा गांगण, मुंबई सचिव प्रियांका पिसे, प्रिया बांदिवडेकर, बोरिवली तालुकाध्यक्ष मनोहर भातुसे, चारकोप तालुकाध्यक्ष कैलाश देशमुख, जिल्हा प्रशासक नईम चौहान, सेवादल उपाध्यक्ष सेलमा आचरेकर उपस्थित होते.

नवी कार्यकारिणी अशी
जिल्हा उपाध्यक्ष – डॉ.प्रमोद मेश्राम, डॉ. विजया लक्ष्मी, जिल्हा सचिव – डॉ. मनोज पटेल, डॉ. ओमप्रकाश पाल, डॉ. ग्यान यादव, तालुकाध्यक्ष – डॉ. रईस खान (दहिसर), डॉ. संतोष दवे (बोरिवली), डॉ.करिष्मा हडबडा (चारकोप), डॉ. उज्वला सैद (कांदिवली)