अजित पवार घेणार आढावा
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या सोमवारी (दि.1 रोजी) माजी आमदार, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकार्यांची आढावा बैठक घेणार आहेत. याबाबतची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.
हे देखील वाचा
आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता पवार बैठक घेणार आहेत. या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांची मत-मतांतरे जाणून घेतली जाणार आहेत. पक्ष संघटनेबाबत पदाधिकार्यांना पवार मार्गदर्शन करणार आहेत.