शहादा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्याविरुद्ध 23 रोजी शहाद्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची व भाजपाची बदनामी केल्याबद्दल शहाद्याचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांनी हा गुन्हा दाखल केला. नबाब मलिक यांनी 28 जानेवारीपासून ते आज पर्यंत विविध वृत्तवाहिन्यांवर पालकमंत्री रावल व भाजपा पक्षाच्या विरोधात बदनामीकारक व्यक्तव्य केल्याचे जमदाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.