राष्ट्रवादी महानगरतर्फे गरजूंना खिचडीचे वाटप

0

जळगाव– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉक डाऊन झाल्यानंतर बंदाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गरजूंना गरजूंची भूक भागवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी गरजूंना खिचडी वाटप करीत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून त्यांचा हा उपक्रम नित्यनेमाने सुरू आहे. बंद काळात कुणीही भुकेला राहू नये म्हणून गरजू नागरिकांसाठी ती सोय करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगितले. तसेच या देशावरील आणि राज्यावरील हे कोरोनाचे संकट टळुदे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.