भाजपा महिला आघाडी रांची मागणी
जळगाव । नुकत्याच जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला यात जळगाव शहरातील सुज्ञ जनतेने लोकशाहीच्या मार्गाने मतदान करून भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन महानगरपालिकेत 57 नगरसेवक निवडून दिलेले आहेत व मनपात भाजपला ऐतिहासिक विजय प्राप्त झाला. महानगरपालिकेत ज्यांचे खाते सुद्धा उघडलेले नाही, अश्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान व महिला आघाडी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द वापरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्कारांचे दर्शन घडविले आहे. भाजपा पक्ष हा संविधान, संस्कृती, महिलांचा सन्मान करणारा पक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा जिल्हा महिला आघाडी जाहीर निषेध करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
ईव्हीएम घोटाळा हे बिनबुडाचे आरोप
महानगरपालिकेत झालेला पराजय त्यांना पचत नसून प्रत्येक ठिकाणी ईव्हीएम घोटाळा होत असल्याचे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. जळगाव शहरातील सुमारे तीन लाख सुज्ञ मतदारांनी केलेल्या मतदानाचा हा अपमान आहे. लोकशाही मध्ये जय पराजय होतच असतो. भाजपा जळगाव शहरात 35 वर्षांपासून विरोधी पक्षात काम करीत होते, परंतु भाजपने कधीच असे लोकशाहीला घातक आरोप कधीच केलेले नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान लक्षात घ्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहरातून भूईसपाट झाल्याने आता बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हातील एकमात्र आमदार यांनी सुद्धा भुईसपाट होण्याची धास्ती घेतल्याचे दिसत आहे.
रांची होती उपस्थिती
भाजपा जिल्हा महिला आघाडीतर्फे नगरसेविका उज्वला बेंडाळे, सिमा भोळे, सिंधुताई कोल्हे, गायत्री राणे, प्रिया जोहरे, मंगला चौधरी, रेश्मा काळे, भारती सोनवणे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, सुरेखा सोनवणे, सरिता नेरकर, अॅड. शुचिता हाडा, दिपमाला काळे, लताताई भोईटे, रुख्सानाबी खान, भाजपा पदाधिकारी रेखा वर्मा, रेखा कुलकर्णी, उषा पाठक, पुजा चौधरी, ममता जोशी, ज्योती राजपूत, शोभा कुलकर्णी, भाग्यश्री चौधरी, पूजा चौधरी, नीतू परदेशी, विद्या सोनवणे, ममता जोशी, जयश्री पाटील, सना खान, छाया पाटील, वृषाली देशपांडे, सुरेखा अमृतकर यांनी कळविले आहे.