पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अशोक प्रदिप गायकवाड, एमआयडीसी एच ब्लॉक, पिंपरी यांची निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या मान्यतेने शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले. पिंपळे गुरवमध्ये झालेल्या युवक मेळाव्यात त्यांनी पदभार स्विकारला.