-काय झाले शास्तीचे, पारदर्शक कारभाराचे, बोपखेल पूलाचे, रिंगरोडचे?
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील भाजपच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या आश्वासनांचे काय झाले असा जाब विचारीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ’महापालिका निवडणुकीत भाजपने दिलेल्या विविध आश्वासनांचे काय झाले’, ‘शास्तीकराचे काय झाले’ ’पारदर्शक कारभाराचे काय झाले’ ’बोपखेल पुलाचे काय झाले’ ’रिंगरोडचे काय झाले’, नियमित पाणीपुरवठाचे काय झाले’ ’स्मार्ट सिटीचे काय झाले’ अशा घोषणा देण्यात आल्या आंदोलनात माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका गीता मंचरकर, सुमन पवळे, नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक काळूराम पवार, फजल शेख आदी कारकर्ते सहभागी झाले होते.