अमळनेर: तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी हर्षल भटू पाटील तर शहराध्यक्ष पदी विश्वास संतोष पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. नूतन पदाधिकार्यांनी संघटनेची बांधणी उत्तमरीत्या करून सर्व स्तरातील युवकांना राष्ट्रवादीशी जोडावे व प्रत्येक गाव तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी युवकची शाखा स्थापन करावी अशी भावना या निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त करून निवडीबद्दल अभिनंदन केले.
नूतन तालुकाध्यक्ष हर्षल पाटील हे जानवे येथील असून याआधी युवक सरचिटणीस पदावर त्यांनी उत्तम काम केले आहे,तर शहराध्यक्ष म्हणून संतोष पाटील यांनीही प्रभावी काम केले आहे,कामाची पावती म्हणूनच त्यांना हि महत्वपूर्ण जवाबदारी पक्षाने दिली आहे.सदर निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील, जेष्ठ नेत्या तथा जिल्हा बँकेच्या संचालीका तिलोत्तमा पाटील, अमळनेर विधानसभाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,पं.स. सदस्य विनोद जाधव, प्रविण वसंतराव पाटील, निवृत्ती बागुल, मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.