राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख

0

मुंबई: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील मेहबूब शेख यांची आज 4 जून रोजी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय युवक कॉंग्रेस अध्यक्ष धीरज शर्मा यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या सोबतच कार्याध्यक्ष पदी सुरज चव्हाण, रविकांत वरपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिनंदन केले आहे.