चाळीसगाव। चाळीसगाव ते मालेगांव हा 49 किमी रस्त्याची सद्यस्थितीत अक्षरश: चाळण झाली असुन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसच्या वतीने 18 रोजी उपमुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नाशिक- मुंबईकडे जाणारा हा रस्ता असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वाहनचालकांचे नियंत्रण जाऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी यज्ञेश बाविस्कर, शुभम पवार, प्रवीण जाधव, देवेंद्र राजपूत, एजाज सय्यद, गणेश महाजन, निरज अजबे, चेतन वाघ, राकेश गायकवाड, प्रवीण काकडे, प्रणाल पवार, अजय पाटील, मयूर अजबे, अमोल पाटील, भूषण चव्हाण आदी उपस्थित होते.