राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शिष्यवृत्ती परिषद

0

पिंपरी: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहरतर्फे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन शिष्यवृत्ती संदर्भात अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना दि.1 ते 6 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार आहे. माहिती जमा करून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाहीर शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन दि. 7 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. तरी शिष्यवृत्ती संदर्भात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसशी संपर्क साधण्याचे आवाहन शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केले आहे.

शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य व केंद्र शासनाकडून विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. पण गेल्या चार साडेचार वर्षात विविध वर्गातील विद्यार्थी, सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे वंचित राहत आहेत. एकीकडे वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, पडलेला शेती भाव यामुळे विद्यार्थी वर्गांच्या पालकाला आपल्या पाल्याचे शिक्षण करणे अवघड होत आहे. दुसर्‍या बाजूला विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शिकणे अशक्य झाले आहे.